डॉ. जयंत नारळीकर यांची ‘धोंडू’ ही ‘हार्ड सायन्स फिक्शन’ प्रकारची कथा आजही तितकीच ताजी, कालातीत ठरते! कारण…
आजच्या घडीला आपण एआय, जनरेटिव टेक्नॉलॉजी, बायोटेक अशा विज्ञानाच्या नव्या वाटा धुंडाळत आहोत. त्यामुळे आज ‘धोंडू’ वाचताना वाटतं की, कथेतील दुविधा केवळ एलियनपुरती नाही. ती एका प्रकारे कोणत्याही नव्यानं उदयास येणार्या तंत्रज्ञानाचा उपयोग, दुरुपयोग आणि विवेकपूर्ण नियंत्रण याचं रूपक आहे. आपण तंत्रज्ञानाला शिरजोर व्हायला वाव देतो आहोत का?.......